अंतरंग भाग - 6 -भावना नसणं नाही, भावना थकणं असतं—



भावना नसणं नाही, भावना थकणं असतं—

कधी कधी शांतता ही healing नसते… ती fatigue असते.

कधी कधी आपण म्हणतो ना—

“काही वाटतच नाहीये आता.”

आणि लोक लगेच समजतात की आपण strong झालो. Mature झालो. Practical झालो.

पण खरं सांगू?

काहीच न वाटणं हे strength नसतं… ते एक प्रकारचं थकणं असतं.


मुळातच माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आणि मानवी मेंदू हा विविध भावनांनी सजलेला आहे. दुखावलं गेलं तर वाईट वाटणारच, राग येणारच, रडू येणारच… हो!

प्रत्येक भावनेला व्यक्त करायला सबल मन हवं—स्वतःचंही, आणि ज्यांच्या समोर आपण व्यक्त होतो त्यांचंही.

इथं विषय येतो validation चा.


काहींना तुमच्या प्रत्येक भावना कळतात, त्यांना प्रतिसादही मिळतो… पण काही ठिकाणी त्या भावनांना किंमत मिळत नाही. आणि असं वारंवार घडलं की बस…

मनाला खात्री होत जाते की ह्या भावना वाटून काही उपयोग नाही, त्यांना प्रतिसाद मिळतच नाही.

पुढच्या वेळी तीच भावना थोड्या कमी तीव्रतेने उठते.

पुन्हा पुढच्या वेळी अजून कमी… मग अजून कमी… आणि कधी कधी तर ती भावना येतच नाही.

असं झालं की वाटतं ना—

I overcame this. I faced this.

पण सत्य असं आहे की त्या भावनेला स्पंदनच नाही आहेत.

आणि हे वाईट नाही बरं का.

हे तुमच्या भावनिक संस्थेचं defence mode आहे.

अशी एखादी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला नक्कीच असेल—जिला व्यक्त व्हायची संधी हवी आहे.

त्यांनाही विविध भावना अनुभवायच्या आहेत.

भावना संपत नाहीत… तर त्या थकतात.

हे जर आपण जाणून घेतलं, तर आपण माणूस म्हणून प्रत्येक व्यक्त झालेल्या भावनेला योग्य प्रतिसाद कसा द्यावा, हे ही समजेल.

Bindass रहा.

जे वाटतं ते वाटू दे. जे नाही वाटत, ते नाही.

पण प्रत्येक feeling व्यक्त करा!

पुन्हा पुन्हा व्यक्त व्हा—

एखाद्या भावनेची स्पंदनं कायमची लुप्त होण्याआधी…

भावना थकण्याआधी…


अंतरंग जाणून घ्या.

For real ,सोपं आहे जगणं!


_Shrutika V. Patankar ©

Comments

Anonymous said…
True....
आपल्या भावनांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. छान लिहिलंयस. 👍

Popular posts from this blog

Chanakyashreyika-chapter 2- “Anvekṣikī: The Intelligence You Either Use or Waste”

#The Treasure of thoughts ...!

Chanakyashreyika Chapter 1- ‘Wanting to learn’