अंतरंग भाग 2 : 'सगळं चांगल्यासाठीच होतं!'
आयुष्य काही सुता सारखं सरळ नाही, हे काही सांगायची गरजचं नाही तुम्हाला. हा प्रवास जरा खडतरच म्हणावा पण अशक्य नाही. बिकट प्रसंग आला कि आपण स्वतःच केलेल सांत्वन किंवा समोरच्याला 'सगळं ठीक होईल ' अशी हमी देणं ही मनुष्य बुद्धी ची एक आगळीचं गोष्ट आहे.
कधी कधी, नाही काही करावसं वाटत. अगदी काहीच नाही. आणि हे काही चुकीचे नाही. जशी आयुष्यात गती महत्वाची तशी विश्रांती पण तितकीच महत्वाची आहे.
मन मोकळं बोलून, तर कधी कुणाचं मन भरून ऐकून घ्यावं,शेवटी आपणचं तर एकमेकांचे सहप्रवासी आहोत ना?
मला आयुष्याबद्दल जे थोडं फार कळालं, ते ह्या कवितेतून व्यक्त झालं :
कालांतराने आयुष्याच कोडं सुटत जात असतं .
आपण प्रयत्नात मात्र हारून जायच नसतं .
प्रत्येक गोष्टीला असतं कारण,
म्हणून नुसतं ते शोधत राहायचं नसतं !
तर, मिळेल त्या दिशेने मार्ग काढत पुढे जायचं असतं .
आणि हो, आयुष्य म्हणजे काही शर्यत नाही,
तुमचा माझा प्रवास आहे,
तेव्हा, अखंड गतीतून काही क्षण विसावायचं ही असतं.
असचं का? असं माझ्यासोबतच का बर घडावं ? वाटत ना असं तुम्हाला ही त्या देवाला विचारावं ?
त्यावेळी, " जे होतं ते चांगल आणि चांगल्यासाठीच. " असं स्वतःला समजवावं....
नाही, हे काही खोट सांत्वन नाही. ही आयुष्यात पुढे जाण्याचासाठी एक प्रेरणा आहे,
प्रत्येक घटनेला एक 'कारण' असतं , हे तर आयुष्यानेच वेळो वेळी सिद्ध केलं आहे!
-Shrutika V. Patankar ©️
Comments
Problems ani paristhiti badalnar nahiye na? Mag asa vatat ki sagle struggle karat ahet. Tyat apli sangun samorchya chi ka manasthiti bigadhvayhi? Kivha vel ghalvaycha? Mag nako hota sangayla...apla apan solve karu...kivha deva var sodu. At the end of the day, he apla ayushya ahe. Aplyala ch samore jaych ahe. We are on our own!
आणि आणखी एक, स्वतः manage karaycha म्हणलं तरी अंतर्मनाशी संवाद आलाच कि! माणसाने माणसाची मदत घेतली तर गैर कुठे? आणि प्रत्येकाला जबरदस्ती जाऊन आपल रडगाणं सांगायची गरज आहे कुठे? जी व्यक्ती आपल्याला समजून घेईल, जरी आपल्या समस्ये वर काही तोडगा नाही देऊ शकली तरी चूक कोणाचीही नाही. बाह्य मार्गाने तुम्हाला प्रेरणा मिळाली तरी बरेच काम हलके होते. पटत नसेल तर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलून बघा!
We are on our own, but we are not meant to be! तुमचा निर्णय आहे शेवटी. पण, जरी देवावर सोडून द्यायच म्हणल तरी ते मन मोकळ केल्या सारखच नाही का? कुठून तरी विचारांना स्त्राव मिळाला म्हणजे झालं. आणि खर सांगू? We are independent is a myth! Its that we become less dependent by time...
सगळं एकट सावरता आला असत, तर नाती किंवा मित्र नकोशे वाटले असते. आणि व्यक्त अश्या व्यक्ती समोरच व्हाव, जी समंजस असेल, आणि तुमची किंवा स्वतःची मनःस्थिती स्थिर ठेवू शकेल.
So, at the end of the day, it is our choice to share whatever we feel with somebody or not. Ultimately, the sharing cannot be obstructed, either you share with someone, or yourself, leave it on your faith it ultimately mind tries to evacuate it in some form! So, be up! I as a human being, stang strong with you.