अंतरंग भाग 5 - 'द्वित्व'

 





"किती हा कळस दुजोरिचा,

उगाच अट्टाहास प्रामाणिक पणाचा.

 

प्रामाणिक पणाने व्यक्त जाहलो जरी,

लोकांना ते आवडेलच ह्याची नाही खात्री.

 

माणसांच्या खोट्या अविरभावाचा देखील राग येतो,

मग आपण लोकांशी नक्की वागावं कस हा प्रश्न पडतो.

 

प्रामाणिक राहून आपल्याकडून कुणी दुखावेल,

तर कधी दुसऱ्यांसाठी स्वभावा विरुद्ध जावं लागेल.

 

माणसांनीच माणुसकी जपायची गरज आहे.

खऱ्याने खऱ्याची साथ निभावायची गरज आहे.

 

असेल अपेक्षा प्रामाणिकतेची साऱ्यांकडून,

असेल तस सत्य स्वीकारावं मग समंजस भावाने समोरच्या कडून.

 

जगण्याचं शल्य अजब आहे खरं!

खरं - खोट्याच्या पलीकडे जावं , आणि समजुतीने आपण माणसात वावरायला हवं."

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------



'नेहमी खरे बोलावे ' असं आपल्यावरती अगदी लहानपणापासूनच बिंबवलेल असतं. पण जेव्हा समाजात एक व्यक्ती म्हणून आपली भूमिका साकारताना, आयुष्यातला ह्या पटा बद्दल गोष्टी उमगतात. कुणी प्रामाणिकपणाने तुम्हाला सल्ला देतं, आणि ते नकळत तुम्हाला दुखावतं, तेव्हा प्रामाणिकपणापेक्षा स्वतः च्या भावानांना महत्व दिलं जातं. आणि दुसरीकडे, खोटेपणाच्या मुखवट्यांचा सुद्धा ठाम पणे निषेध करतो आपण

मग नक्की कराव तरी काय? आपण प्रामाणिक राहावं. पण दुसऱ्याला दुखावता. आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा मोठ्या मनाने स्वीकार करावा मग ते तुम्हाला भावणार असो किंवा नसो. सोप्पं आहे. फक्त हे कळायला वेळ लागतो. म्हणूनचं, मला जेव्हा हे माणसांच्या बाबतीतलं कोडं सुटलं, तेव्हा लगेचचं तुमच्यासमोर मांडत आहे. कारण माणसं समजली कि माणुसकीही कळते....

 

-Shrutika. Patankar 

 

Comments

Shrihari p. said…
खूप सुंदर 👏🏻👏🏻👏🏻

Popular posts from this blog

‘The Neuroscientific Nexus of Meditation, Lucid Dreaming, and Everyday Life’-pt2-Exploring the realms of neuroscience my way.

My experience of research- at 1st year BAMS

'The Bystander Effect'- pt1-Exploring The realms of Neuroscience my way.